अक्सा बीचवर गेलेल्या ८ पर्यटकांना बचावले

अक्सा बीचवर गेलेल्या ८ पर्यटकांना बचावले

मालाड येथील अक्सा बीचवर गेलेले ८ जण पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले होते. मात्र मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लाईफ गार्डच्या मदतीने ८ जणांची सुखरुप सुटका केल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले. दरम्यान, ८ जणांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.

अक्सा बिचवर गुरुवारी दुपारी ८ पर्यटक गेले होते. या लोकांना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले होते. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी बचावकार्य सुरु केले. यावेळी ८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील मुख्य सहा चौपाट्यांवर लाईफगार्डचे पथके तैनात करण्यात ठेवली आहेत तसेच अग्निशमन दलाची रेक्यू टीमही तैनात ठेवली आहेत. महापालिकेने अक्सा चौपाटीवर ‘दृष्टी लाईफसेव्हिंग’ या कंपनीचे सहा लाईफगार्डचे पथक तैनात ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in