रिझर्व्ह बँकेचे चार बँकांवर सहा महिन्यांसाठी केले निर्बंध लागू

आरबीआयने फसवणुकीशी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला ५७.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला
रिझर्व्ह बँकेचे चार बँकांवर सहा महिन्यांसाठी केले निर्बंध लागू
Published on

रिझर्व्ह बँकेने ढासळती आर्थिक स्थिती पाहता चार बँकांवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय आरबीआयने फसवणुकीशी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला ५७.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे सांगितले. या निर्बंधामुळे संबंधित बँकेचे ग्राहक आता फक्त आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेतूनच पैसे काढू शकतात. तर साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सुरी (पश्चिम बंगाल) आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., बहराइचवर निर्बंध लादले.

साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार २०,००० रुपयांपेक्षा जास्त काढू शकत नाहीत. सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ही मर्यादा ५०,००० रुपये आहे, तर नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी आता पैसे काढण्याची मर्यादा प्रति ग्राहक १०,००० रुपये करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने बिजनौर-आधारित युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर अनेक निर्बंधांसह ग्राहकांकडून पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in