कलिना संकुलात रंगलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेचा निकाल जारी

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात रंगलेल्या या सायक्लोथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटात चांगली चुरस पाहायला मिळाली
कलिना संकुलात रंगलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेचा निकाल जारी

सिद्धार्थ दवंडे आणि निम शुक्लाने चुरशीच्या शर्यतीत बाजी मारत मुंबई हौशी सायकलिंग संघटना आयोजित अल्पाईन बाईक्स युनिव्हर्सिटी सायक्लोथॉन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकाविले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात रंगलेल्या या सायक्लोथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटात चांगली चुरस पाहायला मिळाली. पुरुषांच्या १२.५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत दुसरा आलेला कुणाल महाडिकने विजेत्या सिद्धार्थसमोर चांगले आव्हान उभे केले होते. शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हे दोघे एकमेकांना मागेपुढे टाकत होते; पण निर्णायक क्षणी सिद्धार्थने मुसंडी मारत विजेतेपद निश्चित केले.

या गटात श्याम गौड तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. मुलींच्या गटात अदिती शिंदेंनी निम शुक्लला १० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत चांगली टक्कर दिली; पण अनुभवी निमने वेगावर कमालीचे नियंत्रण ठेवत पहिले स्थान मिळवले. या दोघींच्या चढाओढीत निकेला डिसुझाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. एमएमआरडीएचे माजी आयुक्त आर ए राजीव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि नेहरु युवा केंद्र संघटन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

स्पर्धेतील इतर निकाल

मुले १८ वर्षांखालील (१० किलोमीटर) : ओमकार चव्हाण (प्रथम), शौर्य मकवाना (द्वितीय), अलोकेश्वर महिंद्रकर (तृतीय)

मुले १६ वर्षांखालील (७.५ किलोमीटर) : हर्ष पवार (प्रथम), ओमकार चव्हाण (द्वितीय), पार्थ पेडणेकर (तृतीय).

मुले १२ वर्षांखालील (२.५ किलोमीटर) : जीविन मार्लेशा (प्रथम), रुद्र बागवे (द्वितीय), देवम रावळ (तृतीय).

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in