शिवडी येथील रेती बंदर परिसर होणार पूरमुक्त ; बॉक्स ड्रेन टाकल्याने पाणी साचण्याची कटकट दूर

शिवडी येथील रेती बंदर आऊट पोल ते हाजी बंदर रोड येथे १० बाय १० मिमी व्यासाचा बॉक्स ड्रेन टाकण्याचे काम पूर्ण
Representive Photo
Representive Photo
Published on

शिवडी येथील रेती बंदर आऊट पोल ते हाजी बंदर रोड येथे १० बाय १० मिमी व्यासाचा बॉक्स ड्रेन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात येथील नागरिकांची पाणी तुंबण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाल्याचे शिवडी प्रभाग क्रमांक २०६ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. दरम्यान, पडवळ यांनी या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पडवळ यांच्या प्रयत्नाने शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक २०६ मधील शिवडी बीडीडी चाळ क्र.५ ते १६ हा संपूर्ण परिसर सखल भागी असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सद्य स्थितीत शिवडी स्टेशन पासून गाडी अड्डा नाला मार्गे कोलगेट आऊट पोल नाला हा एकमेव मार्ग होता. परंतु पाण्याचा फ्लो मोठा असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत नव्हता. पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी दुसरा मार्ग दोन टप्प्यात बनविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यातील पहिला टप्पा म्हणजेच रेती बंदर आऊट पोल ते हाजी बंदर रोड येथे १० बाय १० मिमी व्यासाचा बॉक्स ड्रेन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे पडवळ यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in