‘स्मार्टकार्ड’मुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप; पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ

गेल्या दोन दिवसांपासून हे स्मार्टकार्ड बनवण्यासाठी लागणारा फोटो व अन्य कागदपत्रे जमा करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील सहाव्या मजल्यावर गर्दी होऊ लागली आहे. आगाऊ अपॉइंटमेंट घेऊनच पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येते. तरीही लांबच लांब रांगा लागत आहेत.
‘स्मार्टकार्ड’मुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप; पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ

मुंबई : कार्पोरेट लूकप्रमाणे मुंबई महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या कारभारावर टीका केली जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याच्या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्रासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेच्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही कागदी ओळखपत्र देण्यात येते. कोरोना काळात या ओळखपत्राचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आल्यामुळे कोर्टाने याची दखल घेतली होती. ओळखपत्राचा गैरवापर होऊ नये, म्हणून पालिकेने नवीन योजना अंमलात आणावी, असे निर्देशही कोर्टाने दिले होते. त्यानुसार कॉर्पोरेट लूक असलेले आकर्षक, क्यूआर कोडयुक्त ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी पालिका तब्बल ६ कोटी ८३ लाख शजार ५४० रुपये खर्च करणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हे स्मार्टकार्ड बनवण्यासाठी लागणारा फोटो व अन्य कागदपत्रे जमा करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील सहाव्या मजल्यावर गर्दी होऊ लागली आहे. आगाऊ अपॉइंटमेंट घेऊनच पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येते. तरीही लांबच लांब रांगा लागत आहेत.

मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या एक लाख २ हजार कामगार कर्मचारी व अधिकारी वर्ग आहे. त्याशिवाय सुमारे ९५ हजारांच्या आसपास सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.

logo
marathi.freepressjournal.in