बंडखोरांचा विद्रूप चेहरा उघड; किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला टोला

शिंदे गट व भाजपचे सरकार अनधिकृत आहे, असे सांगत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
बंडखोरांचा विद्रूप चेहरा उघड; किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला टोला

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी करत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे गट व भाजपचे सरकार अनधिकृत आहे, असे सांगत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवण्याची मागणी न्यायालयात शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यावरून बंडखोरांचा विद्रूप चेहरा समोर येत आहे, असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गट व भाजपला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in