रेल्वे मंत्र्यांकडून मुंबईतील रेल्वे प्रकल्पांचा आढावा, लोकलने प्रवास करत प्रवाशांसोबत साधला संवाद

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर क्षेत्रात ३०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या १६ हजार २४० कोटी रुपयांच्या १२ प्रकल्प कार्यान्वित प्रकल्पांचा आढावा घेतला.
रेल्वे मंत्र्यांकडून मुंबईतील रेल्वे प्रकल्पांचा आढावा, लोकलने प्रवास करत प्रवाशांसोबत साधला संवाद
Published on

मुंबई : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर क्षेत्रात ३०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या १६ हजार २४० कोटी रुपयांच्या १२ प्रकल्प कार्यान्वित प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच लोकल ट्रेनने प्रवास करत प्रवाशांसोबत संवाद साधला.

रेल्वे मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मध्य रेल्वे येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी सीएसएमटी येथील हेरिटेज इमारत आणि भव्य जिना पाहिला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नियोजित पुनर्विकासाचे लघू थ्रीडी मॉडेल पाहिले. तसेच रेल्वेच्या विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. रेल्वे मंत्र्यांनी उपनगरीय स्थानकाला भेट देत स्टेशन व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांनी आरएलडीएच्या पुनर्विकासाच्या कामाची प्रगती आणि सीएसएमटी स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगची माहिती घेतली. त्यानंतर वैष्णव यांनी अंबरनाथ लोकल ट्रेनच्या द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.

वैष्णव यांनी मुंबई क्षेत्रातील विविध प्रकल्प आणि त्यांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. सध्या मुंबई महानगर क्षेत्रात ३०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आणि १६,२४० कोटी रुपयांचे एकूण १२ प्रकल्प कार्यान्वित असल्याची माहिती दिली.

logo
marathi.freepressjournal.in