तरुणीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी रिक्षाचालकास अटक; पीडित तरुणीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू

घरातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघालेल्या एका तरुणीला फूस लावून रिक्षातून अर्नाळा येथे आणून तिच्यावर एका रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तरुणीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी रिक्षाचालकास अटक; पीडित तरुणीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू
Published on

मुंबई : घरातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघालेल्या एका तरुणीला फूस लावून रिक्षातून अर्नाळा येथे आणून तिच्यावर एका रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रिक्षाचालकाला वनराई पोलिसांनी अटक केली. राजरतन सदाशिव वायवळ असे या ३२ वर्षीय आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून या गुन्ह्याच्या तपासासह आरोपीला पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री उशिरा एक तरुणी राममंदिर रेल्वे स्थानकाबाहेर रडत होती. तिला पाहून एका व्यक्तीने तिची चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. या माहितीनंतर वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित मुलीला आधी जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर आणि नंतर परळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. नालासोपारा येथे एका रिक्षाचालकाने विचारपूस केल्यानंतर तिने आत्महत्या करायची आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने अर्नाळा येथे आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

logo
marathi.freepressjournal.in