रिद्धी-सिद्धी झाल्या १० वर्षाच्या! जुळ्या रिध्दी-सिध्दीचा वाढदिवस वाडिया रुग्णालयात साजरा

आई-वडिलांनी सोडल्यापासून रिद्धी-सिद्धी रुग्णालयात राहतात. त्या दोघीं रुग्णालयाचा एक भाग बनले आहेत
File Photo
File Photo

परळ येथील वाडीया रूग्णालयात सयामी जुळ्या असलेल्या रिद्धी-सिद्धी यांचा दहावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिद्धी-सिद्धी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. रूग्णालयाच्या आवारात डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडिलांनी सोडल्यापासून रिद्धी-सिद्धी रुग्णालयात राहतात. त्या दोघीं रुग्णालयाचा एक भाग बनले आहेत.

वाडीया रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या की, “दरवर्षी प्रमाणे या वर्षीही १० वर्षांच्या रिद्धी-सिद्धी यांचा मोठा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या रुग्णालयाच्या मुली आमच्या प्रेरणास्थान आहेत. जुळ्या मुलांचा सर्व वैद्यकीय खर्च, शालेय शिक्षण, पोषण आणि इतर गरजा रुग्णालय पूर्ण करते. या दोघींही मुली हसतमुखाने सर्व अडचणींचा सामना करत आहेत. या मुली त्यांची दैनंदिन कामे स्वतःच करत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in