उघड्या मॅनहोलचा धोका कायम; संरक्षक जाळ्या फक्त साडेपाच हजार मॅनहोलवर

उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम वॉर्ड स्तरावर सुरू एका संरक्षक जाळीसाठी ८ हजार रुपये मोजावे लागतात.
उघड्या मॅनहोलचा धोका कायम; संरक्षक जाळ्या फक्त साडेपाच हजार मॅनहोलवर

मुंबई : मुंबईतील उघडी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही मलनिःसारण व पर्जन्य विभागाच्या मिळून एक लाख मॅनहोलपैकी फक्त ५ हजार ६७४ मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा धोका कायम आहे.

बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा परळ येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून ऑगस्ट २०१७ मध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आणि पालिकेवर टीकेची झोड उठली. उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयानेही पालिकेची कानउघाडणी केली. उघडी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्याचे आदेश देत तज्ज्ञ वकील व पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत मलनिःसारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या एकूण १ लाखाहून अधिक मॅनहोल आहेत. उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम प्रगतिपथावर असून वॉर्ड स्तरावर निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात दिली. न्यायालयात माहिती देऊन सहा महिने उलटले, तरी अद्याप निविदा प्रक्रियाच राबवण्यात येत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा धोका कायम आहे.

संरक्षक जाळी ८ हजारांत!

उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम वॉर्ड स्तरावर सुरू एका संरक्षक जाळीसाठी ८ हजार रुपये मोजावे लागतात. आयुक्तांच्या आदेशानुसार संरक्षक जाळ्यांची डिझाईन व प्रति नग किती रुपये याचा आराखडा सादर केला होता. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार विभाग स्तरावर उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

या भागात संरक्षक जाळ्यांसाठी निविदा

खार परिसरातील उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून १ कोटी ८९ लाख ६० हजार रुपये खर्च, मलबार हिल, पेडर रोड, ग्रँट रोड परिसरातील उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून दर निश्चिती अद्याप ठरलेली नाही. अंधेरी पूर्व व पश्चिम भागातील उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पालिकेच्या २४ वॉर्डातील उघड्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकूण मॅनहोल - १ लाख २८६

मलनिःसारण विभाग : ७४ हजार ६९३

पर्जन्य जलवाहिन्या विभाग : २५ हजार ५९३

रक्षक जाळ्यांची स्थापना करण्याचा विभाग: १,९८२ पाऊस पाण्याच्या नाल्यांचा विभाग: ३,६९२ सर्वसंख्या: ५,६७४

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in