आयडियल शालेय प्रीमियर लीग स्पर्धेत आरएमएमएस संघाचे विजयपद

आयडियल शालेय प्रीमियर लीग स्पर्धेत आरएमएमएस संघाचे विजयपद

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व यंग स्पोर्ट्स क्लबतर्फे आयाजित आयडियल शालेय प्रीमियर लीगच्या एक दिवसीय मालिकेमधील कबड्डी स्पर्धेत प्लॅटिनम आरएमएमएस संघाने यंग आर्मी सेव्हनचा ७ गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले.

अष्टपैलू सक्षम सूर्यवंशी व आर्य कोरगावकर यांच्या चढाईचा खेळ प्लॅटीनम आरएमएमएस संघाला विजयासाठी उपयुक्त ठरला. कबड्डीप्रेमी अशोक राणे, राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक पवार, अशोक शिरगावकर, कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.

राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या १५ वर्षाखालील शालेय मुलांच्या स्पर्धेत प्लॅटीनम आरएमएमएस संघाने पहिल्या डावात ३१-१४ अशी मोठी आघाडी घेतली. परंतु मध्यंतराची मोठी पिछाडी त्यांना भरून काढता न आल्यामुळे प्लॅटीनम आरएमएमएस संघाने ५०-४३ अशी बाजी मारली.

तत्पूर्वी घाटकोपर-पश्चिम येथील माणेकलाल क्रीडांगणात झालेल्या उपांत्य सामन्यात प्लॅटीनम आरएमएमएस संघाने सिल्व्हर एमआरआरकेएसचा ४९-३८ असा तर पहिल्या डावात १० गुणांनी आघाडी घेणाऱ्या आयडियल चॅम्पचा यंग आर्मी सेव्हन संघाने ४४-४१ असा पराभव केला.

दरम्यान, जय भवानी क्रीडा मंडळाच्या सहकार्याने समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक दुसरी एक दिवसीय शालेय कबड्डी स्पर्धा २१ मे रोजी चिंचपोकळी-पूर्व येथे होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in