श्रीराम मंदिर ते रेवस बंदर रस्त्याचे काम लवकरच होणार पूर्ण

एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आपल्या निवेदनात या रस्त्याचे महत्व स्पष्ट केले आहे.
श्रीराम मंदिर ते रेवस बंदर रस्त्याचे काम लवकरच होणार पूर्ण
Published on

श्रीराम मंदिर ते रेवस बंदर (ता. अलिबाग) रस्त्याचे बरेच महिने रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट मेरीटाईम बोर्डाचे (एमएमबी) मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी दिली.

ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच अमित सैनी यांची भेट घेऊन अपूर्णावस्थेत असलेला हा रस्ता लवकरात लवकर उभारण्याबाबत त्यांना लेखी निवेदनाद्वारे आग्रही विनंती केली हा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी सबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आपल्या निवेदनात या रस्त्याचे महत्व स्पष्ट केले आहे.

हा रस्ता तयार झारल्यानंतर एस. टी.सेवा पुर्वव्रत होईल व प्रवाशांचा आर्थिक भार कमी होईल. तसेच नवीन रस्ता क्रॉक्रीटचा होणार आहे. एम एम बी मार्फत यासाठी सुमारे ३ कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात येत आहे. याबद्दल शेवटी एआयपीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी एमएमबी ला धन्यवाद दिले

logo
marathi.freepressjournal.in