दक्षिण मुंबईतील रस्त्यांनाही व्हीआयपी ट्रिटमेंट; पेडर रोड, नेपियन्सी रोडची सफाई यांत्रिक झाडूने

राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, श्रीमंत वर्ग, सेलिब्रेटी हे प्रामुख्याने दक्षिण मुंबईत वास्तव्यास. त्यामुळे या भागात पालिकेकडून नेहमीच तातडीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
दक्षिण मुंबईतील रस्त्यांनाही व्हीआयपी ट्रिटमेंट; पेडर रोड, नेपियन्सी रोडची सफाई यांत्रिक झाडूने

मुंबई : राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, श्रीमंत वर्ग, सेलिब्रेटी हे प्रामुख्याने दक्षिण मुंबईत वास्तव्यास. त्यामुळे या भागात पालिकेकडून नेहमीच तातडीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. विशेष म्हणजे, दक्षिण मुंबईतील पेडर रोड नेपियन्सी रोड, वाळकेश्वर आदी भागातील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने होणार आहे. यासाठी प्रतिकिमीसाठी पालिका दोन हजार रुपये कंत्राटदाराला मोजणार आहे.

मुंबईतील काही मोठ्या प्रमुख रस्त्यांची सफाई ही यांत्रिक झाडूने केली जाते. आता दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर रोड, पेडर रोड आणि नेपियन्सी रोड यासह या विभागातील प्रमुख रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने केली जाणार आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी या यांत्रिक झाडूचा वापर या रस्त्यांवरील साफसफाई केला जाणार आहे. महापालिकेच्या डी विभागामध्ये अर्थात दक्षिण मुंबईतील मलबार हिल आदी परिसरात व्हीआयपी मंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश व इतर न्यायाधीश तसेच अनेक राष्ट्रांचे सल्लागार व प्रतिनिधी, भारतातील आघाडीचे उद्योगपती, व्यापारी आणि सेलिब्रेटी राहत आहेत. तसेच वाळकेश्वर रोड, पेडर रोड व नेपियन्सी रोड यावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हालचाल असते. त्यामुळे महापालिकेच्या डी विभागाने या विभागातील काही प्रमुख रस्त्यावर यांत्रिक झाडू व इतर संलग्न उपकरणे वापरून याची सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन शिफ्टमध्ये चालणार काम!

दोन पाळ्यांमध्ये या यांत्रिक झाडूची सेवा घेण्यात येत आहे. प्रति किलोमीटरसाठी २०५२ रुपये मोजले जाणार आहे. त्यामुळे ६१०३ पाळ्यांसाठी एकूण १ कोटी ३० लाख २४ हजार २९० रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी राम इंजिनिअरिंग ॲण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in