आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून लुटमार

या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिने घडलेला प्रकार शीव पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून लुटमार
Published on

मुंबई : आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन एका महिलेच्या घरातून १८ लाख रुपयांची कॅश पळविणाऱ्या एका टोळीचा शीव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत मुख्य आरोपींसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संतोष प्रथवीलाल पटेल, राजाराम दादू मांगले, अमरदिप लक्ष्मण सोनावणे, भाऊराव उत्तम इंगले, सुशांत रामचंद्र लोहार, शरद हनुमंत लोहार, शरद हनुमंत एकावडे, अभय लक्ष्मण कासले आणि रामकुमार छोटेलाल गुजर अशी त्यांची नावे आहेत. शीव येथे राहणाऱ्या श्रीलता रामकुबेर पटवा यांच्या घरी आलेल्या चार जणांनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर ते चौघेही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेल्या सुमारे अठरा लाख रुपये घेऊन पलायन केले होते. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तिने घडलेला प्रकार शीव पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in