रोहन गायकवाडला ‘आंतरराष्ट्रीय यू एक्स डिझाईन’ पुरस्कार

अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून ‘मानव-संगणक परस्परसंवादात’ पदव्युत्तर पदवी मिळवली
रोहन गायकवाडला ‘आंतरराष्ट्रीय यू एक्स डिझाईन’ पुरस्कार

मुंबई : मुंबईत जन्मलेला, कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या रोहन राजेंद्र गायकवाड याने अलीकडेच अमेरिकेमधील सर्व्हिसनाऊ या त्याच्या सध्याच्या कंपनीमध्ये ‘नोड मॅप ३-डी आयटी अॅसेट इंटरॲॅक्टिव्ह व्हिज्युअलायझेशन’ या प्रकल्पासाठी प्रतिष्ठित ‘आंतरराष्ट्रीय यू एक्स डिझाइन पुरस्कार २०२३’ मिळवला आहे.

रोहनचे प्राथमिक शिक्षण दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात झाले. त्यानंतर त्याने भारतातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्था आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला. डिझाइनमधील बीटेककडे त्यांचा कल असल्याने त्याने २०११ मध्ये डिझाइनमध्ये पदवी पूर्ण केली. तद्नंतर अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून ‘मानव-संगणक परस्परसंवादात’ पदव्युत्तर पदवी मिळवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in