राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड झाली. बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पहिलं जातं. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपकडून लढवली होती, पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in