रूम टू रिडचा ‘गर्ल एज्युकेशन प्रोग्राम’

४००० पेक्षा जास्त विद्यार्थी, ८० शिक्षक आणि २८ समर्पित कार्यसंघ सदस्यांचा समावेश आहे
रूम टू रिडचा ‘गर्ल एज्युकेशन प्रोग्राम’
Published on

मुंबई : ‘रूम टू रिड’च्या वतीने ‘गर्ल एज्युकेशन प्रोग्राम (जीईपी) २०२३’ अंतर्गत ‘डिजिटल राह बने सुगम, हर कदम बेटी के संग’ या त्यांच्या वार्षिक कॅम्पेनचा शुभारंभ करण्यात आला. युवतींमध्ये डिजिटल साक्षरता वाढीस लावणे आणि त्यांचा सोशल मीडियाचा सुरक्षित वापर सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे. हे कॅम्पेन ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत सुरू राहील. जवळपास १४ शाळांनी परिवर्तनशील उपक्रमाचे यजमानपद भूषवले असून त्यामध्ये ‘रूम टू रिड’चे ६०० पालक, संगोपनाची जबाबदारी घेतलेले, समुदाय सदस्य, ४००० पेक्षा जास्त विद्यार्थी, ८० शिक्षक आणि २८ समर्पित कार्यसंघ सदस्यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in