‘रोप वे’चा परिवहन सेवेत होणार समावेश; जल वाहतूक वाढवा-परिवहन मंत्र्यांच्या सूचना

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे.
‘रोप वे’चा परिवहन सेवेत होणार समावेश; जल वाहतूक वाढवा-परिवहन मंत्र्यांच्या सूचना
एक्स @PratapSarnaik
Published on

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत जल वाहतूक वाढविण्यावर भर देण्यासह परिवहन विभागांतर्गत ‘रोप वे’ या नवीन परिवहन सेवेचा अंतर्भाव करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिल्या.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या दालनात वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिवहन मंत्र्यांनी मुंबईमध्ये कोणत्या मार्गांवर कोणती परिवहन सेवा उपलब्ध करून देता येईल, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले.

भूमीगत पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी व्यावसायिक मॉल असावे. यासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. बांद्रा पूर्व ते कुर्ला दरम्यान ८.८ किलोमीटर अंतराची ही सेवा असून यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. यामध्ये दर १५ सेकंदाला स्टॉप असणार आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in