
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (RCB)च्या लाईट हाऊस प्रकल्पाने २०१८ साली कफ परेडमधील मच्छिमार नगर झोपडपट्टीतील लहान मुलांसाठी आपले दरवाजे उघडले. या अंतर्गत झोपडपट्टीतील मुलांना इंग्रजी बोलणे, तायक्वांदो, नाटक, वकृत्व आणि इतर आत्मविश्वास निर्माण करणारे उपक्र अगदी मजेशीर पद्धतीने शिकवले जातात.
४० मुलांपासून झालेली सुरुवात आता यात १४० मुलांवर येऊन पोहचली आहे. या मुलांनी १४ ऑगस्ट रोजी त्यांच्या कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष मनोज पाटोदिया यांनी हे समाजसेवेचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगत रोटरी कशासाठी उभी आहे हे याची साक्ष असल्याचं सांगितलं.
ही मुले आपल्या शाळांमध्ये नावलौकिक मिळवत असून याचं श्रेय लाईट हाऊस प्रकल्पाला देत आहेत. या मुलांचं यश बघून इतर शाळा देखील त्यांच्या वंचिक विद्यार्थ्यांसाठी असेच उपक्रम सुरु करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेशी संपर्क साधत आहेत.