आरपीएफ अधिकाऱ्याला मारहाण; सहाजणांना अटक

एक दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या सहाजणांना अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरपीएफ अधिकाऱ्याला मारहाण; सहाजणांना अटक

मुंबई : अंधेरीतील आरपीएफमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्‍या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या सहाजणांना अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. रोहित पद्माकर भंगेरा, रुबेन ऍन्डू डिसोझा, सुरज वसंत भोवड, आतिक सुनिल वाळिंबे, रुबेन जितेंद्र लाड आणि पल ऍन्थोनी भालेराव अशी या सहाजणांची नावे आहेत. एक दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या सहाजणांना अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मनूभाई जयसिंगभाई सोलकी हे रेल्वे पोलीस फोर्समध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून सध्या त्यांची नेमणूक अंधेरी येथील आरपीएफमध्ये आहे. सोमवारी सकाळी पावणेसात वाजता ते रेल्वे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी अंधेरी रेल्वे स्थानकातील गेट क्रमांक दहाजवळ चार ते पाच तरुण रेल्वेच्या हद्दीत बाईक पार्क करुन स्मोकिंग करत होते. यावेळी त्यांनी त्यांना सिगारेट पिऊ नका, तसेच रेल्वे हद्दीत बाईक करु नका असे सांगितले. यावेळी एका तरुणाने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in