आरटीओच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला मारहाण

अंधेरीतील आरटीओ कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजय मोहन गुमास्ते यांना मारहाण केल्याप्रकरणी तीन आरोपींना आंबोली पोलिसांनी अटक केली.
आरटीओच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला मारहाण

मुंबई : अंधेरीतील आरटीओ कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजय मोहन गुमास्ते यांना मारहाण केल्याप्रकरणी तीन आरोपींना आंबोली पोलिसांनी अटक केली. हनीफ इब्राहिम मकवाना, समीर सलीम मकवाना आणि आदिल राजी मकवाना अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवली येथे राहणारे संजय गुमास्ते मंगळवारी कार्यालयात असताना भावी मोटार ट्रेनिंग स्कूलचा प्रतिनिधी हनीफ हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत आला होता. त्याच्याकडे सहा आंतरराष्ट्रीय परमीट अर्ज होते. त्यावर त्याला संजय गुमास्ते यांची स्वाक्षरी हवी होती. ते अर्ज घेतल्यानंतर त्यांनी त्याची शहानिशा केल्यानंतर स्वाक्षरी करतो, असे सांगितले. याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी हनीफसोबत असलेल्या इतर दोन प्रतिनिधींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्यांनी संजय गुमास्ते यांना हाताने तसेच बेल्टने मारहाण केली. हा प्रकार तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी मारहाण करणाऱ्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी झालेल्या संजय गुमास्ते यांच्यावर जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in