महिला आयोगाकडे महिलांबरोबरच पुरुषांच्याही येतात तक्रारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केला खुलासा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एका मुलाखतीमध्ये महिलांसोबतच पुरुषांचाही तक्रारी येत असल्याचा खुलासा केला
महिला आयोगाकडे महिलांबरोबरच पुरुषांच्याही येतात तक्रारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केला खुलासा

एका मुलाखतीदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना, 'पुरुषांच्याही तक्रारी तुमच्याकडे येतात का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी खुलासा केला की, "महिला आयोगाकडे पुरुषांचाही तक्रारी येत असतात. त्यांच्याही तक्रारींवर कारवाई करतो." यावेळी त्यांनी मुलाखतीमध्ये अनेक मुद्दयांवर आपली मते मांडली.

अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "मी जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, त्याचदिवशी पहिली तक्रार ही एका पुरुषाचीच होती. तो म्हणाला होता की, तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार हे समजताच मी खूप लांबून प्रवास करून आलो असून माझी तक्रार माझ्या पत्नीविरोधात आहे. पहिली तक्रार माझी घ्या, असे सांगिलते. आम्ही महिलांसाठी काम करत असलो तरीही, आम्ही पुरुषांच्याही तक्रारी घेतो" असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे त्या म्हणाल्या की, "एखाद्या पुरुषाची तक्रार आल्यानंतर आम्ही त्यांच्या संबंधित कुटुंबाला बोलवून समुपदेशन करतो. कारण कुटुंब संस्था ही आपल्या समाजाचा पाया असून कुटुंब टिकवण्यावर आमचा भर असतो." असे मत त्यांनी यावेळी मांडले.

logo
marathi.freepressjournal.in