भारतीय चलन बाजारात रुपयाने नीचांक पातळी गाठली

आंतरबँक परकीय चलन बाजारात भारतीय चलन ७७.९९ वर उघडला आणि शेवटी ७८.१७ च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाले
भारतीय चलन बाजारात रुपयाने नीचांक पातळी गाठली

देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून निधी काढून घेण्याचा लावलेला सपाटा यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे बुधवारी भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी घसरून ७८.१७ (तात्पुरत्या) या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. आंतरबँक परकीय चलन बाजारात भारतीय चलन ७७.९९ वर उघडला आणि शेवटी ७८.१७ च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाले, मागील ७८.०४ च्या तुलनेत १३ पैशांनी घसरण झाली.

विशेष म्हणजे रुपया ८१ च्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रुपयाच्या सततच्या घसरणीच्या दरम्यान, तज्ञांच्या हवाल्याने एका अहवालात असे म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपया ८१च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर जाऊ शकतो. म्हणजेच, त्यात आणखी घट नोंदविली जाऊ शकते. मात्र, दरम्‍यान, ही पातळी तोडल्‍यानंतर रुपया पुन्‍हा वधारण्‍याची शक्‍यता त्यांनी व्‍यक्‍त केली आहे. रुपयाच्या घसरणीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे तेलाच्या किमतींपासून दैनंदिन वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे.

विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा परिणाम

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा गोंधळ होतो तेव्हा गुंतवणूकदार डॉलरकडे वळतात. जेव्हा डॉलरची मागणी वाढते, तेव्हा इतर चलनांवर दबाव वाढतो. जगभरातील अनिश्चिततेबद्दल बोलताना, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा खंडित झाला आहे, ज्यामुळे जगभरात अराजकता निर्माण होणार आहे. जेव्हा अनिश्चितता असते आणि डॉलरला सुरक्षित चलन मानले जाते तेव्हा लोक सुरक्षित चलनाची खरेदी करतात. परकीय गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरु आहे. त्याचा परिणाम परकीय चलनाच्या साठ्यावर होतो आणि डॉलरची मागणी वाढते, तर रुपयाची मागणी कमी होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in