अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा नवा नीचांक; ६१ पैशांनी घसरगुंडी

रुपया प्रति डॉलर ८३.०१ या नव्या नीचांकी पातळीवर गेला. मागील सत्रात मंगळवारी रुपया १० पैशांनी घसरुन ८२.४०वर बंद झाला
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा नवा नीचांक; ६१ पैशांनी घसरगुंडी

भारतीय रुपया बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत होऊन नव्या नीचांकी पातळीवर गेला. रुपयाची ६१ पैशांनी घसरगुंडी होऊन ८३ची पातळी ओलांडली. विदेशात अमेरिकन डॉलर्स मजबूत झाल्याने रुपयाची आणखी घसरण झाली. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेली वाढ आणि गुंतवणूकदारांना धोका पत्करायचा नसल्याने स्थानिक चलन ८२.३२वर उघडले आणि नंतर ते ८३.०१ या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ६१ पैशांनी घसरला. यूएस ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलर पुन्हा मजबूत झाला. रुपया प्रति डॉलर ८३.०१ या नव्या नीचांकी पातळीवर गेला. मागील सत्रात मंगळवारी रुपया १० पैशांनी घसरुन ८२.४०वर बंद झाला होता.

एका खाजगी क्षेत्रातील बँकेतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाला ८२.४०च्या पातळीपासून सपोर्ट करणे बंद केल्यावर, तिची मोठी विक्री झाली. जोपर्यंत आरबीआय पुन्हा समर्थन करत नाही तोपर्यंत, कोणतीही पातळी निश्चित केली जाऊ शकत नाही. रुपयाचे अवमूल्यन होत जाईल. बुधवारी रुपयात सुमारे ६६ पैशांची म्हणजेच डॉलरच्या तुलनेत सुमारे ०.८ टक्का घसरण झाली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो ८२.३६वर बंद झाला होता.

ब्रिटनमध्ये महागाईचा ४० वर्षांचा उच्चांक झाला आहे. त्यामुळेवाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड लवकरच कर्जावरील व्याजदरात वाढ करणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्याचाही परिणाम रुपयाच्या घसरणीवर झाल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in