डॉलरच्या तुलनेत रुपया २९ पैशांनी मजबूत

विदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरु झाल्याने गुंतवणूकदारांना पुन्हा विश्र्वास मिळाल्याचे दिसते
डॉलरच्या तुलनेत रुपया २९ पैशांनी मजबूत
Published on

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २९ पैशांनी मजबूत होऊन ७९.४५ झाला. बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली आणि विदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरु झाल्याने गुंतवणूकदारांना पुन्हा विश्र्वास मिळाल्याचे दिसते. शिवाय, क्रूड तेलाच्या दरात घसरण, घाऊक महागाईत झालेली किंचित घसरण आदी कारणांमुळे रुपयाला बळ मिळाल्याचे फॉरेक्स ट्रेडर्सने म्हटले. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये स्थानिक चलन बुधवारी सकाळी ७९.३२ वर उघडले आिण दिवसभरात ते ७९.२६ आणि ७९.४८ ही कमाल व किमान पातळी गाठली होती. दिवसअखेरीस ते डॉलरच्या तुलनेत मागील बंदच्या तुलनेत ७९.४५वर बंद झाले.

logo
marathi.freepressjournal.in