धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी झुंबड

धनत्रयोदशीनिमित्त दोन दिवसांत ४० हजार कोटींची विक्री शक्यता अ. भा. व्यापारी महासंघटनेने व्यक्त केली
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी झुंबड

धनत्रयोदशीला मुंबईसह देशभरात सोने खरेदीसाठी झुंबड उडाली. दोन वर्षानंतर बाजारपेठा खुल्या झाल्याने ग्राहकांनी मनसोक्त खरेदी केली. दिवसभरात हजारो कोटी रुपयांची सोने खरेदी झाल्याचा अंदाज आहे.शनिवारी रात्री मुंबईच्या जवळी बाजारात सोने व सोन्याचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांचे एकच लगबग सुरू होती. त्यानंतर देशाच्या मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास वर्ष चांगले जाते असा अनेकांचा समज आहे त्यामुळे अनेक ग्राहक वर्षानुवर्षण चुकता धनत्रयोदशीला सोने खरेदी करतात विरारला राहणाऱ्या सुरेश जैन यांनी सांगितले की गेल्या ४९ वर्षापासून मी येथे येत आहे. मी धनत्रयोदशीला सोन्याचे नाणे खरेदी करतो त्यामुळे ते माझ्यासाठी भाग्यशाली ठरते.

हिनागाला या सोने खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या सोने शुद्ध खरेदीसाठी मी बाजारात आली आहे या दुकानात 1788 पासून सोने व चांदीचे दागिने मिळतात या ठिकाणाहून सोने खरेदी केले असते भाग्यश्री ठरते असे गाला म्हणाल्या सोने-चांदी व्यापारातील सूत्राने सांगितले की यंदा नाण्यांची विक्री 30% तर 70 टक्के दागिन्यांची विक्री अपेक्षित आहे तरी यंदा विक्रीत 35 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे असे भारतीय बुलियन ज्वेलरी असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले सोने-चांदीचा बाजार उद्याही सुरू राहणार आहे त्यामुळे अनेक जण उद्या येऊनही खरेदी करतील यंदाच्या खरेदीसाठी गर्दी चांगली आहे ज्यांचे बजेट कमी आहे ते इमिटेशन ज्वेलरी खरेदी करत आहे असे मेहता म्हणाले.

तीस ते पस्तीस टक्के विक्री वाढण्याची शक्यता शनिवारी सकाळपासूनच ग्राहकाने सोने-चांदी खरेदी केली यांनी प्री-बुकिंग केले होते त्यांनी शनिवारी डिलिव्हरी घेतली सोन्याच्या दागिन्याबरोबरच ग्राहकांनी हिरे खरेदी केले त्यांना दोन दिवस मुहूर्त असल्याने विक्री गेल्या वर्षाच्या तुलने 30 ते 35 टक्के वाढण्याची शक्यता आहे असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.

४० हजार कोटींची विक्री!

धनत्रयोदशीनिमित्त दोन दिवसांत ४० हजार कोटींची विक्री शक्यता अ. भा. व्यापारी महासंघटनेने व्यक्त केली. सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबरच वाहन, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, किचनची भांडी, इलेक्िट्रक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in