सचिन वाझे विश्वासार्ह नाही! माफीचा साक्षीदार बनण्यास ईडीचा आक्षेप

माफीचा साक्षीदार व दोषमुक्त होण्याचा हक्क असल्याचा दावा करीत वाझेच्या वकिलांनी विजय मदनलाल चौधरी व इतर खटल्यांचा संदर्भ दिला
सचिन वाझे विश्वासार्ह नाही! माफीचा साक्षीदार बनण्यास ईडीचा आक्षेप
PM

मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे हा विश्वासार्ह साक्षीदार बनूच शकत नाही. त्याच्या जबाबावर विश्वास ठेवता येणार नाही, अशी भूमिका घेत ईडीने वाझे याला माफीचा साक्षीदार बनवण्यास जोरदार आक्षेप घेतला.

सीबीआयने वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यास संमती दिली आहे. मात्र ईडीने संमती मागे घेतली. त्याला आक्षेप घेत वाझेने स्वहस्ताक्षरात अर्ज केला. त्यावर सोमवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पुढे सुनावणी झाली.

माफीचा साक्षीदार व दोषमुक्त होण्याचा हक्क असल्याचा दावा करीत वाझेच्या वकिलांनी विजय मदनलाल चौधरी व इतर खटल्यांचा संदर्भ दिला; मात्र वाझेचा यापूर्वी दिलेला जबाब दडपण्याचा डाव आहे. तो खंडणी वसुली, धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांत आरोपी आहे. अशा स्थितीत माफीचा साक्षीदार बनवून त्याच्या जबाबावर विश्वास ठेवू शकत नाही. सुरुवातीला आम्ही संमती दिली. नंतर सहआरोपींचे जबाब व वाझेच्या अर्जातील मुद्द्याचा अभ्यास केल्यानंतर ती संमती मागे घेतल्याचे ईडीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाने वाझेच्या वकिलांना उर्वरित युक्तिवाद करण्यासाठी संधी देत सुनावणी ९ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

logo
marathi.freepressjournal.in