सचिन वाझेची हायकोर्टात धाव; एनआयएने चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप

अँटिलिया स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा दावा करून बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सचिन वाझेची हायकोर्टात धाव; एनआयएने चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप
Published on

मुंबई : अँटिलिया स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा दावा करून बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दखल घेत एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

उद्योगपती अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली गाडी बेवारस सोडण्यात आल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस निरीक्षक निरीक्षक सचिन वाझे याच्यासह विनायक शिंदे व इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एनआयए आरोपींना ताब्यात घेतले.

एनआयएने ज्या पद्धतीने ताब्यात घेतले, त्यालाच आक्षेप घेत सचिन वाझे याने याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.

यावेळी वाझे याच्या वतीने अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी बाजू मांडताना सांगितले की, यूएपीएपी कायद्यांतर्गत एनआयएने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा दावा केला. याची दखल घेत खंडपीठाने एनआयला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २३ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

logo
marathi.freepressjournal.in