सचिन वाझे यांचा सत्र न्यायालयाकडे अर्ज

सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी वाझेने दर्शवली
सचिन वाझे यांचा सत्र न्यायालयाकडे अर्ज

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माफीचा साक्षीदार झालेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी आता अनिल देशमुख यांच्या विरोधातील ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली आहे. तशी विनंती करणारा अर्ज वाझेने सत्र न्यायालयात केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेलाही अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी वाझेने दर्शवली आणि माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज सत्र न्यायालयात केला. तो अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर आता वाझेने आपल्या वकिलामार्फत अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने दाखल केलेल्या दुसऱ्या प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा दर्शवली आहे. याप्रकरणी ईडीकडून आपल्याला अटक करण्यात आलेली नाही. तसेच आपला जबाबही नोंदविण्यात आला आहे. जबाबामध्ये या प्रकरणाशी संबंधित सर्व माहितीही आपण तपास यंत्रणेला दिली आहे. सीबीआय आणि ईडीचे हे प्रकरण सारखेच आहे. या प्रकरणात सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत आपला जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला या प्रकरणातही माफीचा साक्षीदार करण्यात यावे, अशी विनंती वाझेने केली आहे. त्याच्या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in