मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात धाव

याचिकेत राज्य गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व इतरांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात धाव

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाजाचे सुरू केलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तें यांनी हायकोर्टात धावत घेत याचिका दाखल केली आहे. हे आंदोलन रोखा तसेच आंदोलकांवर कारवाई करा, अशी मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे; मात्र या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती सदावर्ते यांच्यामार्फत करण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीनी जोर घरला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २५ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. दिवसेदिवस राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन उग्र रूप धारण केले. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकरान होत आहे. सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याची भिती व्यक्त करत आंदोलनाला हिंसक स्वरुप देणाऱ्या आंदोलकांविरुद्ध कारवाईचे निर्देश द्या, अशी मागणी याचिकेत केली आहे.

यापूर्वी सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात कायदेशीर लढा सुरू ठेवला होता. त्यांच्या विरोधानंतरच मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या नव्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे. बुधवारी, १ नोव्हेंबरला दाखल झालेल्या या याचिकेवर न्यायालय रजिस्ट्रींकडून सुनावणीसाठी ८ नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे. असे असले तरी याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी म्हणून सदावर्ते शुक्रवारी द्विसदस्यीय खंडपीठासमोर विनंती करणार आहेत. या याचिकेत राज्य गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व इतरांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in