मुंबईतील २२७ वॉर्डात 'सद्भावना यात्रेचे' आयोजन

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधींना आदरांजली
मुंबईतील २२७ वॉर्डात 'सद्भावना यात्रेचे' आयोजन

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसतर्फे रविवारी कूपरेज मैदान, चर्चगेट येथील राजीव गांधी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी राजीव गांधी यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

राजीव गांधी यांनी केलेल्या अमूल्य कामाची माहिती जनसामान्यांना अवगत व्हावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून २२७ वॉर्डांत सायंकाळी मुंबई काँग्रेसतर्फे "सद्भावना यात्रा" काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान राजीव गाधींनी केलेल्या कार्याबाबत माहिती देणारे परिपत्रक २२७ वॉर्डमधील सर्वसामान्य नागरिकांना, मुलां मुलींना, महिलांना व सर्व जनतेला देण्यात आले. ज्यामध्ये स्व. राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र विकसित होण्याकरिता केलेली पायाभरणी, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना दिलेले ३३ टक्के आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती, तरुणांना १८ व्या वर्षी दिलेला मतदानाचा अधिकार, जवाहर नवोदय विद्यालय शिक्षणाचे विकेंद्रीकरण, राजी गाधींच्या कारकिर्दीत देशामध्ये दूरसंचार विभागामध्ये झालेली क्रांती अशा अनेक महान कार्यांची माहिती सर्वांना देण्यात आली.

या वेळी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार अमीन पटेल व अस्लम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हांडोरे, माजी आमदार मधू चव्हाण आणि अशोक भाऊ जाधव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदीप शुक्ला आणि महेंद्र मुणगेकर व सचिव कचरु यादव, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in