सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर समुद्रात विद्युत रोषणाई; अंधेरीतील सागर कुटीर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू

यासाठी मुंबई महापालिका तब्बल २६ कोटी ५६ लाख ७६ हजार ३९० रुपये खर्चणार आहे.
सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर समुद्रात विद्युत रोषणाई; अंधेरीतील सागर कुटीर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू

मुंबई : दुबई, सिंगापूर येथील समुद्रात आकर्षक विद्युत रोषणाई पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. त्याच धर्तीवर आता अंधेरी पश्चिम येथील सागर कुटीर, वर्सोवा समुद्रकिनारी गोबो प्रोजेक्शनद्वारे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २६ कोटी ५६ लाख ७६ हजार ३९० रुपये खर्चणार आहे.

गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा, अक्सा बीच या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक येत असतात. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या सहाही चौपाट्यांवर स्वच्छता राखणे, पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आता योजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंधेरी पश्चिम गणेश विसर्जन लेन, जनरेटिव्ह कंटेन्ड अँड डायनॅमिक सीन क्रिएशनसह प्रोजेक्शन मॅपिंग टेक्नोलॉजी इंटर अॅक्टिव्ह फ्लोअर, प्रोजेक्शन मॅपिंग अँड गोबो प्रोजेक्शनद्वारे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. जेणेकरून सागर कुटीर समुद्र परिसरात येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सिंगापूर, दुबई येथील समुद्रात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते, त्याच धर्तीवर अंधेरी पश्चिम येथील सागर कुटीर समुद्रात विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in