सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणाला नवी कलाटणी; रुग्णालयाच्या अहवालाने प्रश्नांची सरबत्ती

Saif Ali Khan stabbing : अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपावरून बांगलादेशी नागरिक शरीफूल इस्लाम याला अटक केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर पडदा पडत असताना लिलावती रुग्णालयाच्या अहवालामुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे.
सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणाला नवी कलाटणी; रुग्णालयाच्या अहवालाने प्रश्नांची सरबत्ती
Published on

एस. बालकृष्णन/मुंबई

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याच्या आरोपावरून बांगलादेशी नागरिक शरीफूल इस्लाम याला अटक केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर पडदा पडत असताना लिलावती रुग्णालयाच्या अहवालामुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

बांद्रा पोलिसांना १६ जानेवारी रोजी लिलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या अहवालाने या प्रकरणाला नवी कलाटणी दिली आहे. वैद्यकीय-न्यायालयीन (मेडिको-लीगल) प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णालयाला पोलीस ठाण्याला अहवाल सादर करणे आवश्यक असते.

डॉ. भार्गवी पाटील यांनी १६ जानेवारी रोजी पाठविलेल्या अहवालानुसार, सैफला दुपारी ४.११ वाजता (सकाळी असावे) त्याचा मित्र अफसर झैदी याने रुग्णालयात आणले. मात्र, हल्ला रात्री २ वाजता झाला असल्याने, सैफला रुग्णालयात आणण्यासाठी जवळपास दोन तास लागले. या दोन तासांत सैफ काय करत होता, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रथम ऑटोरिक्षा, नंतर मित्र?

सुरुवातीला सैफला एका ऑटोरिक्षातून रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ऑटोरिक्षाचालकाने सैफसोबत एक प्रौढ पुरुष आणि एक मुलगा असल्याचे सांगितले. हा मुलगा तैमूर असल्याचे म्हटले जात होते. मात्र, करिना कपूर स्वतः सैफसोबत रुग्णालयात का गेली नाही, याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. माहितीनुसार, सैफसोबत असलेला प्रौढ पुरुष त्याचा मुलगा इब्राहिम असल्याचे मानले जात होते. मात्र, रुग्णालयाच्या अहवालानुसार, सैफसोबत त्याचा मित्र अफसर झैदी होता. तैमूरचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

प्राथमिक उपचारांना उशीर का झाला?

रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चाकूचा २.५ इंच लांब तुकडा सैफच्या मणक्याजवळ अडकला होता. त्यामुळे तीव्र रक्तस्राव होऊन जीवघेणा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत, तातडीने रुग्णालयात जाण्याऐवजी सैफने दोन तास घरात कुटुंबासोबत घालवले, हे आश्चर्यकारक आहे.

पोलिसांच्या तपासाबाबत संशय

पोलीस तपासाच्या वेगाशी संबंधित प्रश्नही उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून प्रकरणातील माहिती अत्यल्प प्रमाणात समोर येत असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आहे का किंवा तपासात हलगर्जीपणा होत आहे, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी साम्य आहे का, याची खातरजमा करण्यासाठी चेहरामोहरा ओळख चाचणी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने शरीफूल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर (३०) याची पोलीस कोठडी २९ जानेवारीपर्यंत वाढवली.

logo
marathi.freepressjournal.in