'तेजोमय-आनंदोत्सव कलेचा' अंतर्गत कार्यशाळांचा सोहळा

इंस्टाग्राम लाईव्हद्वारे 'संगीत संध्येचे' आयोजन
'तेजोमय-आनंदोत्सव कलेचा' अंतर्गत कार्यशाळांचा सोहळा

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङमय मंडळ हे मुंबई विद्यापीठातील सर्वात जुने कार्यरत मंडळ आहे. मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्राचीन इतिहास त्याचबरोबर त्याचे महत्त्व आजकालच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ कायमच कटिबद्ध असते. यावर्षी मंडळ शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहे.

'तेजोमय' या वार्षिक अंकाची थीम सालाबादप्रमाणे याही वर्षी जाहीर करण्यात आली. 'तेजोमय-आनंदोत्सव कलेचा' या थीम अंतर्गत २८, २९, ३० ऑक्टोबर २०२२ या दरम्यान पार पडलेल्या सोहळ्यात अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी - प्रसाद चव्हाण, क्षिरजा राजे, मानसी पंडित, शौमिक रहाटे, संजना रत्नपारखी, दुर्गा येसदे, तिर्था सामंत व अपूर्वा येमुल ह्यांनी कला, संगीत, नृत्य, नाट्य अश्या विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळांचा आनंद लुटला.

तिसऱ्या दिवशी इंस्टाग्राम लाईव्हद्वारे 'संगीत संध्येचे' आयोजन करण्यात आले होते. प्रांजली बडे, कुंजल दवे, वैष्णवी बोरुळकर, हिया किलम, धीरज कदम यांनी आपल्या सुरेल सुरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. इंस्टाग्राम लाईवच्या अखेरीस 'पखरण' या वार्षिक अंकाची थीम घोषित करण्यात आली. 'नाळ' अशी या वर्षीची थीम आहे. येत्या दिवसात म. वा. मं. तर्फे अनेक ऑफलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी म. वा. मं. ला इंस्टाग्राम, फेसबुक, लिंकडीन तसेच ट्विटर वर फॉलो करू शकता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in