'सहकार आयुक्त'पदी साैरभ राव

राज्य सरकारने आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. साखर आयुक्तपदी कार्यरत असलेले डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त म्हणून केली आहे.
'सहकार आयुक्त'पदी साैरभ राव

मुंबई : राज्य सरकारने आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. साखर आयुक्तपदी कार्यरत असलेले डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त म्हणून केली आहे. या पदावर असलेल्या सौरभ राव यांची राज्याच्या सहकार विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

सहकार विभागाच्या आयुक्तपदी असलेले अनिल कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती केली असून गोंदिया येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आली आहे. सातारा येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. खिल्लारी यांची पुणे येथे इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभागाच्या संचालकपदी, धाराशिव येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची छत्रपती संभाजी नगरच्या महाडिस्कॉम येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून, चंद्रपूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगुनाथम एम. यांची गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, यवतमाळ येथील सहाय्यक जिल्हाधिकारी यशनी नागराजन यांची सातारा येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in