खरेदी केलेल्या फ्लॅटची दुसऱ्या व्यक्तीला विक्री

५३ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला
खरेदी केलेल्या फ्लॅटची दुसऱ्या व्यक्तीला विक्री

मुंबई : पुर्नविकास सुरू असलेल्या इमारतीमध्ये खरेदी केलेला फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विक्री करुन एका वयोवृद्धाची सुमारे ५३ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी बांधकाम कंपनीच्या पाच संचालकाविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी आग्रीडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मोहम्मद आसिफ युसूफ रिंगदानी, मोहम्मद सोहेल युसूफ रिंगदानी, मोहम्मद जुनेद युसूफ रिंगदानी, मोहम्मद सलीम सुपारीवाला आणि अन्वर रंगवाला अशी या पाचजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ६३ वर्षांचे वृद्ध लोअरपरेल येथे राहत असून, त्यांची हिंद एक्सपोर्ट नावाची नकली ज्वेलरीचा व्यवसाय आहे. मोहम्मद जुनैदची हमारा प्रॉपर्टीज व्हेचर या रिअल इस्टेट डेव्हलपर्स नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीत इतर चारही आरोपी संचालक म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे नवीन फ्लॅटसंदर्भात चर्चा केली होती. यावेळी त्याने त्यांना मोतलीबाई स्ट्रिटवरील मदनी मेनोर या इमारतीचे पुर्नविकास होणार असून, या इमारतीमध्ये त्यांना एक फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. वन रुम किचनच्या रुमची किंमत ५१ लाख रुपये असून इतर टॅक्स त्यांना भरावे लागतील असे मोहम्मद जुनैदने सांगितले होते. फ्लॅटचे पूर्ण पेमेंट केल्यानंतर त्यांना तीन ते चार वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. यावेळी त्याने त्यांना इमारतीचा एक प्लान दिला होता. त्यात तळमजला ते सहाव्या मजल्यापर्यंत पार्किंग आणि सातव्या मजल्यापासून निवासी फ्लॅट बनविण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.

logo
marathi.freepressjournal.in