मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या कुलाबा, बाणगंगा, चारकोप, माहूल, चेंबूर या पाच मलजल प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. पाच मजलज प्रक्रिया केंद्रातील २ कोटी १३ लाख लिटर पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. दर निश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच पाणीगळती, पाणीचोरी यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता बघता, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरात आणता यावे, यासाठी पाच ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र सुरू केली आहेत. याठिकाणी दररोज २ कोटींहून अधिक लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, मैदाने शौचालयात वापराता येणार आहे. तसेच मुंबईतील मोठ्या कंपन्यांतही पिण्याव्यतिरिक्त पाण्याची गरज असते. त्यामुळे पाच मलजल प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी विक्री करण्यात येणार आहे. पाण्याची विक्री करण्यासाठी दर निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दर निश्चितीसाठी गुरुवारी निविदा मागवल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री
कुलाबा - १ कोटी लिटर
१० लाख लिटर
४५ लाख लिटर
४३ लाख लिटर
१५ लाख लिटर
२ कोटी १३ लाख लिटर पाणी