सलमान खान बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर;चार वेळा हत्येचा प्रयत्न

या टोळीने सलमानला त्याच्या फार्महाऊसच्या वाटेवर मारण्याचा कट रचला होता.
सलमान खान बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर;चार वेळा हत्येचा प्रयत्न

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान गेल्या चार वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आहे. या टोळीने चार वर्षांत सलमानच्या हत्येचा चार वेळा प्रयत्न केला होता. आता याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुरुवारी नवा गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली आहे. पंजाब पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स टोळीने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ला करण्याचे आणखी दोन प्रयत्न केले होते. या टोळीने सलमानला त्याच्या फार्महाऊसच्या वाटेवर मारण्याचा कट रचला होता.

गायक सिद्धू मुसेवालाला मारण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचला होता. प्लॅन ‘ए’ अयशस्वी झाल्यानंतर टोळीने प्लॅन ‘बी’ तयार केला; मात्र याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. या योजनेचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता. गोल्डीने सलमानला मारण्यासाठी कपिल पंडितची (लॉरेन्स गँगचा शार्प शूटर) निवड केली होती आणि पनवेल फार्महाऊसवर जाताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शूटर कपिल पंडितला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येचा खुलासा केला आणि या संपूर्ण कटाची माहिती दिली. लॉरेन्सने २०१८ मध्ये जोधपूर कोर्टातील सुनावणीदरम्यान सलमानला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान केवळ दोनदा जोधपूरच्या कोर्टात आला होता. दोन्ही वेळेस त्याची सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती. अलीकडेच सलमान खानच्या वकिलालाही धमकीचे पत्र आले होते. असेच पत्र त्याचे वडील सलीम खान यांनाही मिळाले होते. यानंतर हे पत्र लॉरेन्सनेच पाठवले असल्याची भीती व्यक्त केली जात होती. सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्सने चार वेळा

दीड महिना फार्महाऊसवर रेकी

कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर शूटर्स यांनी पनवेल येथे दीड महिना भाड्याच्या खोलीत राहून सलमानन खानच्या फार्महाऊसची रेकी केली. लॉरेन्स गँगच्या या सर्व शूटर्सनी सलमानवर हल्ला करण्यासाठी लहान शस्त्रे, पिस्तूल आणि काडतुसे खोलीत ठेवली होती. हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर सलमान खान वाहनाचा वेग कमी ठेवत असल्याचेही शूटर्सच्या लक्षात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in