रेल्वे स्थानकांवर करा आता हेअरकट, फेशिअल; चर्चगेट, अंधेरी स्थानकांवर युनिसेक्स सलून सेवेत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि अंधेरी स्थानकांवर युनिसेक्स सलून सुरू झाले
रेल्वे स्थानकांवर करा आता हेअरकट, फेशिअल; चर्चगेट, अंधेरी स्थानकांवर युनिसेक्स सलून सेवेत

रेल्वे स्थानके म्हटली की, प्रवाशांची गर्दी, अल्पोपहार दुकाने नजरेस पडतात; मात्र धावपळीच्या दिनचक्रात प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वे मार्गाच्या स्थानकावर देखील युनिसेक्स सलून सेवेत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनंतर आता पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि अंधेरी स्थानकांवर युनिसेक्स सलून सुरू झाले आहे. यामुळे स्थानकांवर प्रवाशांना हेअरकट, फेशिअल करणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी सलून सेवा देण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने चर्चगेट आणि अंधेरी स्थानकांवर ही नवीन संकल्पना अंमलात आणली आहे. महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी वातानुकूलित केशकर्तनालय आणि स्पा केंद्र खुले करण्यात आले आहे. ही सेवा नॉन फेअर रेव्हेन्यू (एनएफआर) अंतर्गत सुरू करण्यात आली असून, यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. प्रवाशांच्या जलद सुविधेसह पश्चिम रेल्वेच्या महसुलात देखील यामुळे भर पडणार आहे. सलून सेवेच्या या अनोख्या संकल्पनेचा रोजच्या कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांना चांगलाच फायदा होणार आहे. संबंधित सेवेचे दोन्ही करार एप्रिल २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

अंधेरी स्थानकावरील एलिव्हेटेड डेकवर सलून सुरू

दरम्यान, अंधेरी स्थानकावरील एलिव्हेटेड डेकवर ३२० चौरस फूट क्षेत्रफळ परिसरात सलून सुरू करण्यात आले आहे. ज्याचे वार्षिक परवाना शुल्क ९.७० लाख रुपये असून, एकूण कराराचे मूल्य २९.१० लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे चर्चगेट स्थानकावरील कॉन्कोर्स हॉलला ३८८.५० चौरस फूट क्षेत्रफळ सलून उभारण्यात आले आहे. सलून चालकांकडून २२.५० लाख रुपये वार्षिक परवाना शुल्क असून, एकूण कराराचे ६७.५० लाख रुपये घेण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in