संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली
संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा समाजाशी संबंधित सर्व विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. संभाजीराजेंनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडून त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.

संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास गेले; मात्र मुख्यमंत्री शिंदे हे बैठकांमध्ये व्यस्त होत असल्याने त्यांना भेटीची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे मंत्रालयातून निघून गेले. संभाजीराजे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली; मात्र नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संभाजीराजेंशी संपर्क करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्यात बैठक झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in