हिंदू मंदिर तोडल्याने संतप्त संभाजी सेनेचा आत्मदहनाचा इशारा

वांगणादेवीचे भव्य मंदिर बांधून व प्राणप्रतिष्ठापना करून सर्व हिंदू बांधवांसाठी दर्शनासाठी खुले करावे
हिंदू मंदिर तोडल्याने संतप्त संभाजी सेनेचा आत्मदहनाचा इशारा

मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील गोराई येथील पॅगोडाची नवीन इमारत बांधण्यासाठी ग्राम दैवत स्वयंभू वांगणादेवीचे मंदिर तोडल्याने संतप्त झाल्याने संभाजी सेनेने मंत्रालयाच्या परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. बोरिवली पश्चिमेकडील पॅगोडा येथील विश्वस्त मंडळांनी नवीन इमारत बांधण्यासाठी संगनमत करून हिंदू देवता स्वयंभू वांगणा देवीचे मंदिर १४ मे रोजी संभाजी महाराज जयंती दिवशी मोगली पद्धतीने तोडून उध्वस्त केले या ठिकाणी वांगणादेवीचे भव्य मंदिर बांधून व प्राणप्रतिष्ठापना करून सर्व हिंदू बांधवांसाठी दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी लक्ष्मण शिरसाट पाटील यांनी केली आहे. विश्वस्त मंडळांनी मंदिर उद्ध्वस्त करून खूप मोठा गुन्हा केला असून, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी त्या संबंधित सर्वांना २१ ऑगस्टपर्यंत अटक करून कारवाई न केल्यास २२ ऑगस्ट रोजी मी स्वतः व माझ्यासारखे असंख्य संभाजी सैनिक मंत्रालयाच्या आवारात आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in