औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्‍मानाबाद शहराचे धाराशीव, नामकरण होणार

माझ्याच पक्षातील काही लोकांनी मला दगा दिला, अशी उद्वीग्‍नताही त्‍यांनी व्यक्‍त केली.
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्‍मानाबाद शहराचे धाराशीव, नामकरण होणार

महाविकास आघाडी सरकारवर आलेले अनिश्चिततेचे वादळ गुरूवारी सकाळी विधानसभेत मांडण्यात येणारा सरकारवरील विश्वासदर्शक ठराव या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्‍य मंत्रीमंडळाची बैठक घेतली. यात औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर, उस्‍मानाबाद शहराचे धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता देण्यात आली. या बैठकीत काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस या सहकारी पक्षांचे आभारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले. माझ्याच पक्षातील काही लोकांनी मला दगा दिला, अशी उद्वीग्‍नताही त्‍यांनी व्यक्‍त केली.

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्‍मानाबादचे धाराशीव असे नामकरण करणे हे शिवसेनेसाठी गेल्‍या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न होते. भाजप असो वा मनसे, या पक्षांनी या मुद्द्यांवरून शिवसेनेवर सातत्‍याने टीकास्‍त्रही सोडले होते. राज्‍य सरकार अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे महत्‍वाचे निर्णय घेतले आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी संभाजीनगर व धाराशीव, असे नामकरण करण्याचे प्रस्‍ताव मांडण्यात येणार असल्‍याची माहिती कालच्याच बैठकीनंतर दिली होती. त्‍यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणाची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती, त्‍यालाही मंत्रीमंडळाने मान्यता दिली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in