समलिंगी जोडीदाराला दिलेल्या भेटवस्तूवर कर लादणे पक्षपाती; आयकर कायद्यातील तरतुदीला उच्च न्यायालयात आव्हान

आयकर कायद्यातील तरतुदीला आव्हान देत एका समलिंगी दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समलिंगी दाम्पत्यांमध्ये एकमेकांना दिलेल्या भेटवस्तूवर कर लादणे पक्षपाती आहे. पुरुष-स्त्रीचे दाम्पत्य आणि समलिंगी दाम्पत्य यांच्यात भेदभाव केला जात आहेत, असा दावा याचिकेतून केला आहे.
समलिंगी जोडीदाराला दिलेल्या भेटवस्तूवर कर लादणे पक्षपाती; आयकर कायद्यातील तरतुदीला उच्च न्यायालयात आव्हान
Published on

मुंबई : आयकर कायद्यातील तरतुदीला आव्हान देत एका समलिंगी दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समलिंगी दाम्पत्यांमध्ये एकमेकांना दिलेल्या भेटवस्तूवर कर लादणे पक्षपाती आहे. पुरुष-स्त्रीचे दाम्पत्य आणि समलिंगी दाम्पत्य यांच्यात भेदभाव केला जात आहेत, असा दावा याचिकेतून केला आहे. याची दाखल घेत न्या. बी. पी. कोलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी ॲटर्नी जनरलना नोटीस बजावली आहे.

पायियो आशिहो व विवेक दिवान या समलिंगी दाम्पत्याने ही याचिका दाखल केली आहे. विवेक दिवान यांनी उच्च न्यायालयात वकिली केली असून संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात काम केले आहे. सध्याचा कायदा समलिंगी दाम्पत्यांना पुरुष-स्त्री दाम्पत्यांच्या तुलनेत असमान आर्थिक वागणूक देत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. ध्रुव संघवी यांनी केला.

'पती-पत्नी' हा संदर्भ समलिंगी दाम्पत्यांना लागू करण्याची विनंती

आयकर कायद्याच्या तरतुदीतील 'पती-पत्नी' हा संदर्भ समलिंगी दाम्पत्यांना वगळण्याच्या पातळीवर असंवैधानिक घोषित करण्याची आणि तो दीर्घकालीन स्थिर नातेसंबंधांमध्ये असलेल्या समलिंगी दाम्पत्यांना लागू करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. न्यायालयाने त्यांच्या विनंतीची दखल घेतली.

logo
marathi.freepressjournal.in