मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती; दोघांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून अनेकदा विरोधांकडून हे सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत असल्याची टीका केली जाते
मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती; दोघांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे गटाने भाजपसह सत्ता स्थापन केली. सर्वांना फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसणार असे वाटत असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन सर्वांना धक्का दिला. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जाबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून, या सरकारचे सारथ्य फडणवीसांच्या हाती असल्याचे आरोप सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आले. अशी चर्चा सुरु असतानाच, आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंद आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे एकाच गाडीतून गेले. विशेष म्हणजे या गाडीचे स्टेअरिंग हे फडणवीस यांच्या हाती होते. यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर, आम्ही दोघेही आलटून पालटून गाडी चालवणार आहोत, ते उत्तर दिले. तर, राज्यातील जनतेसाठी हा महामार्ग खुला होणार आहे. तो व्यवस्थित आहे की नाही, हे पाहण्यासाठी ही टेस्टिंग सुरू आहे, अशा भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'हा महामार्ग खुला झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्याचा प्रचंड विकास झालेला पाहायला मिळणार' असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे. त्यापूर्वी या महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली. या दोन्ही नेत्यांनी नागपूरच्या झिरो मैलपासून ते शिर्डीपर्यंतचा ५८६ किलोमीटरचा प्रवास कारने सुरू केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in