संयुक्त महाराष्ट्र संघर्ष उद्यानाला नवीन लूक:आकर्षक विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही, कारंजे; पालिका ९ कोटी रुपये खर्चणार

परळ भोईवाडा परिसरात सुमारे ९ एकर परिसरात बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यान बनवण्यात आले आहे.
संयुक्त महाराष्ट्र संघर्ष उद्यानाला नवीन लूक:आकर्षक विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही, कारंजे; पालिका ९ कोटी रुपये खर्चणार
Published on

मुंबई : परळ येथील बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही कॅमेरे, कारंजे अशी विविध कामे करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ९ कोटी रुपये खर्चणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पालिकेच्या निर्णयामुळे दुरवस्था झालेल्या संयुक्त महाराष्ट्र संघर्ष उद्यान नवीन लूकमध्ये झळकणार आहे.

परळमधील बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यानातील कारंजे नादुरुस्त झाले असून, काही सीसीटीव्ही कॅमेराही बंद पडलेले आहेत. त्यामुळे या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत उद्यानाचे नूतनीकरण करतानाच आकर्षक विद्युत खांब बसवून रोषणाई करण्यात येणार आहे.

परळ भोईवाडा परिसरात सुमारे ९ एकर परिसरात बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यान बनवण्यात आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये लोकार्पण झालेल्या या उद्यानात ११५० मीटर्स सायकल ट्रॅकचे सुशोभीकरणासह नूतनीकरण करण्यात आले होते. या मनोरंजन मैदानाचा विकास करताना यात कारंज्यांसह सीसीटिव्ही बसवण्यात आले होते. तसेच या मनोरंजन मैदानावर पथदिवे बसले होते.

परंतु सध्या या उद्यानातील पथदिवे आणि खांब नादुरुस्त झाले आहेत. तसेच यातील ८ लहान कारंजे आणि एक मुख्य कारंजेही बंद आहेत. त्यामुळे या उद्यानाचे नूतनीकरण करताना यातील सीसीटीव्ही कॅमेरा, कारंजे तसेच पथदिवे नव्याने बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऐतिहासिक उद्याने असून, अनेक उच्चभ्रु व्यक्ती याठिकाणी भेट देतात. त्यामुळे या उद्यानाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, एल्प्रोज इंजिनिअर्स कंपनीची कामासाठी निवड करण्यात आली आहे.

‘असे’ होणार काम

अल्युमिनियम कास्टिंग असलेल्या ९ मीटर उंचीचे १२ विद्युत खांब हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एलईडी फिटिंगसहित बसवणार

अल्युमिनियम कास्टिंग असलेल्या ७ मीटर उंचीचे विद्युत खांब हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एलईडी फिटिंगसहित बसवणार

५ मीटर उंचीचे विद्युत खांब हेरिटेज प्रकारच्या सजावटीत एल फिटिंगसहित बसवणार

logo
marathi.freepressjournal.in