Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत जंगली प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी गेलेल्या सात जणांच्या टोळीतील एका व्यक्तीचा बंदुकीतून झाडलेल्या गोळीतील छऱ्यांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसंग्रहित छायाचित्र
Published on: 

भाईंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत जंगली प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी गेलेल्या सात जणांच्या टोळीतील एका व्यक्तीचा बंदुकीतून झाडलेल्या गोळीतील छऱ्यांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिकारीसाठी जंगलात गेलेल्या महेश गायकर याने अंधारात मोबाईलच्या प्रकाशाला वन्यप्राण्याचे डोळे समजून गोळीबार केल्याने विजय सापटे (६०) यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले.

या घटनेनंतर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आणि मृत्यूची प्रत्यक्ष तपासणी न-करता व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरने प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महेश अनंत गायकर (५२) आणि काठोड लाबड ( ५५) या दोघांना अटक केली आहे.

मोबाईलच्या प्रकाशाने केला घात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चेनागाव परिसरातील डेबुचा घाट भागात शिकारीसाठी सात जण गेले होते. त्यांच्याकडे छऱ्यांची बंदूक आणि ठासणीच्या दोन बंदुका होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास जंगलात विखुरलेल्या या टोळीतील एका व्यक्तीच्या मोबाईलचा प्रकाश दिसला. हा प्रकाश म्हणजे एखाद्या वन्यप्राण्याचे डोळे असल्याचा समज करून महेश गायकर याने आपल्या दोन नळ्यांच्या छऱ्यांच्या बंदुकीतून गोळीबार केला. मात्र, बंदुकीतून निघालेले छर्रे विजय सापटे यांच्या छातीला व पायाला लागले. या गोळीबारात कल्पेश डगला आणि कुणाल शेलार हेही जखमी झाले.

Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

व्हिडिओ कॉलद्वारे मृतदेह दाखवून मिळवली कागदपत्रे

गोळीबारानंतर जखमी विजय सापटे यांना त्यांच्या साथीदारांनी जंगलातून बाहेर आणले. त्यांना उपचारांसाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले. दरम्यान, जखमी कल्पेश डगला याला उपचारासाठी काशिगाव येथील आशिष रुग्णालयात नेण्यात आले. त्याचवेळी विजय सापटे यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांना मृतदेह दाखवून मृत्यूची कागदपत्रे मिळविण्यात आल्याचा आरोप आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in