संजय पांडे यांना नऊ दिवसांची ‘ईडी’ कोठडी

संजय पांडे यांनी २००१मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
संजय पांडे यांना नऊ दिवसांची ‘ईडी’ कोठडी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज लोकेशन घोटाळ्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नऊ दिवसांची ‘ईडी’ कोठडी देण्यात आली आहे. कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना ‘ईडी’कडून अटक करण्यात आली होती. याशिवाय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. संजय पांडे यांची ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून मंगळवारी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली.

परमबीर सिंग यांच्याकडून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर सीबीआयकडून संजय पांडे यांची चौकशी करण्यात आली होती, तर एनएसई कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणीही त्यांची चौकशी केली गेली.

संजय पांडे यांनी २००१मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता; मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. काही काळानंतर ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले आणि आपल्या कंपनीच्या संचालकपदावर त्यांनी आपल्या मुलाला बसवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in