संजय राऊत किरीट सोमय्यांना म्हणाले 'पोपटलाल'; करणार कायदेशीर कारवाई

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्यांना पाठवणार कायदेशीर नोटीस
संजय राऊत किरीट सोमय्यांना म्हणाले 'पोपटलाल'; करणार कायदेशीर कारवाई
Published on

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचादेखील समावेश होता. त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राऊतांना तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र, आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी आरोप करताना किरीट सोमय्यांचा उल्लेख भाजपचे पोपटलाल असा केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की, "भाजपचे किरीट सोमय्या उर्फ ​​पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. ते शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. आता मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करत असून श्री पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस दिली जाईल. लवकरच, सत्याचा विजय होईल. आत होऊन जाऊ दे, जय महाराष्ट्र!" असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in