संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक

संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढतच आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर वेगवेगळे आरोप करत असून राऊत यांनी बुधवारी ‘किरीट का कमाल’ असे ट्विट करत राऊत यांनी बुधवारी सोमय्या यांच्यावर खंडणीखोरीचा तिसरा आरोप केला आहे. मात्र, राऊत यांच्या या हल्ल्यामुळे भाजपचीही कोंडी झाली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर तिसरा मोठा आरोप केला आहे. कंपनीचे नाव आणि तारीख सांगून राऊत यांनी सोमय्यांना कोंडीत पकडले आहे. ईडी, सीबीआयच्या चौकशीची भीती दाखवून सोमय्या उद्योजक व कंपन्यांकडून पैसे कसे उकळत आहेत, याची माहिती राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. ‘‘किरीट सोमय्या यांनी नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये ५६०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. या प्रकरणाची चर्चा व्हावी म्हणून सोमय्या मोतीलाल ओसवाल कंपनीच्या शिपायाच्या घरी गेले. तिथे त्यांनी बराच तमाशा केला. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी ) या प्रकरणाची चौकशी केली. हे सगळे झाल्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान या संस्थेला मोतीलाल ओसवाल या कंपनीकडूनच सलग दोन वर्षे लाखो रुपयांची देणगी मिळाली,” असा दावा राऊत यांनी यात केला आहे. ‘हा घटनाक्रम समजून घ्या’, असा टोलाही संजय राऊत यांनी शेवटी हाणला आहे.

किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचा आव आणत असले तरी ते स्वत: भ्रष्टाचारात बुडाले आहेत. ब्लॅकमेलिंग करून ते लोकांकडून पैसे उकळतात. 'ईडी'चे काही अधिकारीदेखील त्यांना सामील आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी मार्च महिन्यात घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. सोमय्या यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती आपण योग्य वेळी देऊ, असेही त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. होते. त्यानुसार, आता राऊत हे रोजच सोमय्या यांच्यावर आरोप करत आहेत. सोमय्या आरोप करतात आणि त्या आरोपांच्या आधारे ईडी चौकशीची कारवाई सुरू करते. त्यानंतर चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून किरीट सोमय्यांना देणग्या मिळतात, असा राऊत यांचा आरोप आहे.

Related Stories

No stories found.