पाकिस्तानला महत्व, भारत पडला बाजूला; संजय राऊत यांची मोदींवर टीका

पाकिस्तान आणि चीन जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय घेत असताना भारत मात्र बाजूला फेकला गेला आहे. ही भारतासाठी ‘लाजीरवाणी’ गोष्ट आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पाकिस्तानशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युध्दविराम जाहीर केला. त्या संदर्भात ते बोलत होते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबईः पाकिस्तान आणि चीन जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय घेत असताना भारत मात्र बाजूला फेकला गेला आहे. ही भारतासाठी ‘लाजीरवाणी’ गोष्ट आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पाकिस्तानशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युध्दविराम जाहीर केला. त्या संदर्भात ते बोलत होते.

युध्दामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रोकर किंवा दलाल म्हटले होते. भारत अशी दलाली करू इच्छित नाही असे त्यांनी सांगितले होते. आज त्याच पाकिस्तानचे ट्रम्प आभार मानत आहेत, असे नमूद करून राऊत यांनी जयशंकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जयशंकर हे मंत्रिमंडळावरचा एक बोजा असल्याची टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले, ‘स्वत:ला ‘महाविश्वगुरु’ म्हणवून घेणारे पंतप्रधान केवळ ‘टेलिफोन ऑपरेटर'सारखे काम करत आहेत. इतर देश जागतिक मुत्सद्देगिरीत आघाडीवर असताना ते सौदी अरेबिया, जॉर्डन आणि नेपाळच्या नेत्यांशी गप्पा मारण्यात व्यस्त आहेत.’

राऊत यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतन्याहू आणि इराणच्या नेत्यांना चर्चेच्या टेबलावर आणण्याचे श्रेय भारताला मिळायला हवे होते, परंतु सरकारच्या ‘अस्पष्ट भूमिकेमुळे’ हे मोठे राजनैतिक अपयश ठरले आहे. चाळीस दिवस चाललेल्या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तांसमोर न झुकल्याबद्दल त्यांनी इराणचे कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in